ओवाळू आरती माझ्या सद्गुरुराजा
माझ्या दादा महाराजा।
परब्रह्मा चिदानंदा अलौकीक तेजा॥धृ॥
दत्तस्वरूपा सिध्द पुरुषा करुणा सागरा ॥
अगाध महिमा तव वर्णाया बुध्दी दे मजला।। १॥
पाटगावी दत्त पादुका स्थापन त्वां केल्या।
हिंस्त्र पशु संगती भुयारी केले वास्तव्या ॥ २॥
अनंत लीला तुवा दाविल्या सकला जगताला ।
नामस्मरणे तुझ्या जातील दुःखे विलयाला ॥ ३॥
परम शिष्य तव ठाणे वासी गजानन महाराज ।
कृपा प्रसादे तुझ्या लाभले आम्हा हे गुरुराज ।। ४ ॥
भक्त मनोरथ पूरक अससी तू दीनानाथा।
गजाननाचा दास ठेवितो चरणी तव माथा ॥ ५ ॥